ॐ श्री वाजेश्वरी देवीची आरती

ॐ जय वाजेश्वरी माते , तू निर्गुण निराकार
कृपा तुझी सर्वांवर (२) राहो निरंतर
ॐ जय वाजेश्वरी माते ||धृ ||
राजस्थानी प्रकट होऊनी , येथे अवतरसी ,
माते येथे अवतरसी
व्याघ्रावर बैसोनी (२) दर्शन तू देसी
ॐ जय वाजेश्वरी माते ||१||
राजघराण्यातील असे तू , आमुची राजमाता,
माते आमुची राजमाता
मुखकमलावरी तुझ्या (२) राजतेज विलासे
ॐ जय वाजेश्वरी माते ||२||
लालभडक कुमकुम शोभतो, तुझिया लल्लाटी
माते तुझिया लल्लाटी
तुझ्या रूपाने दर्शन घडता (२) देहभान हरपे
ॐ जय वाजेश्वरी माते ||३||
तू विश्वाची आध्यशक्ती अन् तूच आदिमाया
माते तुच आदिमाया
भक्ति शक्ती तू देसी (२) निरासि मोहमाया
ॐ जय वाजेश्वरी माते ||४||
तूच आमुची मायबाप अन् तूच बंधू भगिनी
माते तूच बंधू भगिनी
तुझ्या विना ना कोणी ( २) दुजे त्रिभुवनी
ॐ जय वाजेश्वरी माते ||५||
तू सकलांची तारणहर्ती , तूच कर्ती करविती
माते तुच कर्ती करविती
संकटकाळी बल देसी (२) नुरते आपत्ती
ॐ जय वाजेश्वरी माते ||६||
या भवसागरी आम्हां , तुझाच आधार
माते तुझाच आधार
भवसागरातुनी तरण्या (२) आलो तुझ्या चरणी
ॐ जय वाजेश्वरी माते ||७||
तू सकलांची पालनकर्ती , दे नवविधा भक्ती
माते दे नवविधा भक्ति
तुझ्या गुणाचे वर्णन करण्या , तुझ्या रूपाचे वर्णन करण्या
दे मन:शक्ती
ॐ जय वाजेश्वरी माते ||८||
तुझ्या कृपेने छत्र मागण्या , द्वारी तुझ्या आलो ,
माते द्वारी तुझ्या आलो
कृपाप्रसादे तुझिया (२) कृतकृत्य झालो
ॐ जय वाजेश्वरी माते ||९||

Leave a Reply