सोडुनिया आलो माझे

सोडुनिया आलो माझे मी घरदार
गाठलां मी साई बाबा तुझा दरबार
शिर्डीच्या साई दावा चमत्कार दावा     || धृ ||

करतोस रोज तु भक्तांची चाकरी
असा थोर आहेस तु देव अवतारी
तुझ्या चरणाशी देवा द्यावा विसावा
भाव माझ्या मनीचा तू जाणून घ्यावा   || १ ||

मोडलीस ना तु मर्जी कुणाची
जाणतोस वेदांता तु सर्वांच्या मनाची
कृपा हस्त माझ्यावरी सदा तू ठेवावा
साई साई हाच मंत्र मनी हा रुजावा     || २ ||

अशक्य जे होते घडुनी आणीले 
आंधळ्याला साई बाबा तु दाखविले 
रात दिन देह माझा सेवेत झिजावा
भजनात देवा तुझ्या चिंब चिंब न्हावा  || ३ ||

Leave a Reply