सुनेचं पत्र

प्रिय आई,
पत्राची सुरुवात ‘आई’ हाकेने करतेय कारण मला घरात ‘सासू’ नको ‘आई’ ,’मैत्रीण’हवी….आणि मुलं आईकडे हक्काने मागतात.म्हणून मी हि आज काही मागणार आहे. काही दिवसात मी तुमच्या घरात येईन पण ते घर मला ‘तुमचे’ नाही ‘माझे’ वाटायला हवे. घरात पुरुषाने कितीही पैसा आणला तरी पुरुष घरात ‘स्थैर्य’ आणू शकत नाही.त्यासाठी स्त्रीच लागते.
आजवर तुम्ही त्या ‘आपल्या’ घरात ते स्थैर्य टिकवले,सर्वांना प्रेम दिलेत,सांभाळ केलात…. तुमच्या त्या प्रेमात मला माझा वाटा हवा…हाच माझा हट्ट. तुम्ही हि एक स्त्री आहात,तेव्हा नव्या लग्न झालेल्या स्त्रीच्या डोळ्यांत काय स्वप्न असतात,  काय भीती असते याची तुम्हाला हि
जाणीव असेल,तरी तुम्ही मला हि समजून घ्याल…हि माफक अपेक्षा आहे.

‘आई माझी कि तुझी?’ असा प्रश्न माझ्या नवऱ्याला पडावा इतक्या मायेची अपेक्षा मी तुमच्याकडून करते… “घरात तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम कोण करतं?” असा प्रश्न मला लग्नानंतर कुणी विचारला तर मी हि कोड्यात पडेन..अशी काहीशी जिव्हाळ्याची अपेक्षा मला तुमच्या
कडून आहेत.
घरातली ‘स्त्री’ बिथरली कि पुरुष कोलमडतो….माझा संसार आपण दोघांनी सांभाळावा. चूक झाली तर आई हक्काने ओरडते,मला तुमच्याकडून त्या हक्काची अपेक्षा आहे…
तुम्ही ‘आई’ बना,मी स्वखुशीने ‘मुलगी’ बनेन.माझा हा हट्ट पुरवाल अशी आशा करते. मला तुमच्या घरापेक्षा तुमच्या मनात जागा हवी.
तुमची सून (….मुलगी….????).

Leave a Reply