सुखे करावा संसार

बोधकथा

कोर्टात न्यायाधिशाने  एका मुलीला सांगीतले तु सासरी नांदायला जा, त्यावर उत्तर देताना मुलगी म्हटली साहेब एखाद्याला कारल्याची भाजी जर आवडत नसेल तर ती का खावी, न्यायाधिशाने सुंदर उत्तर दिले कारल्याची भाजी जर आवडतच नसेल तर ती अगोदर ताटात घ्यायचीच कशाला, एक लक्षात ठेव मुली एक दिवस असा येईल की तुला कारल्याच्याच भाजीची गरज पडेल, तीच  भाजी तुला खावी लागेल, कारल्याची भाजी किती कडु असली तरी तिला चवदार बनवणे हे सुगरणीच्या हातात आहे                                    यावरून आपल्याला एकच घ्यायचे आहे की संसारात सुख दु:खाचे कडु प्रसंग येतात म्हणुन संसार टाकु नये,याउलट तो कसा चवदार होईल हे आपल्या हातात आहे,मग त्याची खरी गोडी लागेल.

सुखे करावा संसार |

 न संडावे दोन्ही वार |

दया क्षमा घर | 

चोजवीत येतील ||

Leave a Reply