सुखाची खरेदी

माणूसकीच्या बाजारामध्ये;
‘दिखावेपणाची’ लयलूट आहे,
सापडेल का हो ‘Shop’ एखादं
जिथे ‘सुखावरती’ सुट आहे..

अगदीच जिर्ण ‘झोळी’ माझी;
पायी ‘बुजरेपणाचं बुट’ आहे,
सरळमार्गी जगण्यामध्ये;
किचकट भारी ‘Root’ आहे,

दुःखावरती एक्सेंज ऑफर;
‘आनंदाने’ भरली ‘मुठ’ आहे,
शोधतोय असं दुकान नवखं;
जिथे ‘सर्वकाही’ झूट आहे,

गर्दी नको ‘आडमुठेपणाची’;
आणि ‘समंजसपणाची’ तिथे ‘तुट’ आहे,
सापडेल का हो ‘Shop’ एखादं
जिथे ‘सुखावरती’ सुट आहे

Leave a Reply