संसाराचं गीत

नवऱ्याने बायकोची
टिंगल टवाळी करू नये
पुण्य नाही जमलं तर
पाप तरी करू नये

नाव ठेवायला काय लागतं
आदर करायला शिका
पसारा करण्यापेक्षा
घर आवरायला शिका

बहीण-भाऊ , आई-वडील
माहेर सोडून येते
रात्रं दिवस घरासाठी
बायको राबत असते

एखाद्या वेळेस दोन शब्द
बोलत असेल रागात
स्त्री सारखं सहनशील
आहे का कुणी जगात ?

बायकोला नावं ठेवण्यामध्ये
पुरुषार्थ थोडाच असतो
कौतुकानं बोलणारा
नवरा हवा असतो

कधी तरी म्हण वेड्या
” किती काम करतेस ! ”
माझ्या फाटक्या संसारात
सुंदर रंग भरतेस

मग तीचा चेहरा बघा
कसा फुलून येतो
गजरा माळला नाही तरी
सुवास मात्र येतो

Tenty four by seven
बायको उपसते कष्ट
कितीही ओळी लिहिल्या तरी
न संपणारी गोष्ट

” तीला ” चांगलं म्हणणं म्हणजे
बाकीचे थोडेच वाईट
बायकोला कमी लेखणारे
पुरुष नसतात Right

दोघांनीही एकमेकाला
समजून घेतलं पाहिजे
प्रपंचाच गोड गाणं
सुरात म्हटलं पाहिजे

दोघांपैकी कुणाचीही
चाल बिघडू नये
संसाराच्या गीताचा
ताल बिघडू नये…

Leave a Reply