संचारबंदी आणि जेवणाचे नियोजन

आज कचरा गाडी आली तेव्हा अगदी गेटजवळ थांबली, एरवी गेट पासुन रोडपर्यंत येवुन कचरा टाके पर्यंत न थांबता पुढे निघून जाणारा बेडर ड्राइवर आणि मागुन येवून तावातावाने बोलणारा ठेकेदार अगदी केविलवाण्या स्वरात बोलले मँडम उद्या उरलेले अन्नपदार्थ वेगवेगळ्या कॅरीबॅग मध्ये टाकाल का प्लिज ,,,, नम्र पणे हातातील डस्टबिन घेऊन गेला … मी अवाक् ,… तितक्यात शेजारच्या काकूंनी कारण विचारले तर म्हणाला रस्त्यावर जे उपाशी मरताय जे अनाथ, अपंग ,म्हातारे आहेत त्यांना हे अन्न वाटत आहोत … ते लोक पाण्यात मिसळून चुरुन खातात. काय बोलावं ते सुचलं नाही , कधी रडु कोसळले कळलं नाही, काका म्हटले हे घे पैसे तर म्हणाला पैसे नको पोटाला भाकरी पाहीजे .. मोठ्या घरची लोक (ज्यांना अन्नाची किंमत नाही ) शिळ टाकून देतात ना .. तेवढ्यात भागतं त्यांचं .अन्नपदार्थ बस कचरयात टाकु नका,
३ कॉलनीत कचरा गोळा करून एक गोणी (३० किलो चा कट्टा असतो ती पिशवी) भरुन पोळ्या, ब्रेड, पाव, न निवडलेल्या भाजी च्या जुड्या, भात, अख्खी शिळी काकडी, टमाटे ई साहित्य जमवलं होते. हे सर्व पाहून आपल्याला किळसवाणे वाटते, तो मात्र हे सर्व अगदी नीट काळजी पुर्वक निवडून वेगवेगळे करत म्हणाला ३० -३५ जणं जेवतात एवढ्यातं.


खूप वाईट वाटलं. अन्नपदार्थ लागतील तेवढेचं करा एका वेळी एक भाजी आणि माणशी २-३ पोळ्या एवढे गणित पक्क करा, आपल्याला अजूनही १७ दिवस (??) संचारबंदी मुळे घरात राहायचे आहे. कुटुंबाला लागेल तेवढाचं स्वयंपाक करा, उरल्यासुरल्या चा वापर करून नवीन पदार्थ तयार करा, अन्न वाया घालवू नका. रोज ४ -४ पदार्थ करायला हवेत का? रोज एक प्रकार करा पण कमी प्रमाणात, जेणेकरून काहीही वाया जाणार नाही, घरातील सामान संपल्यानंतर दुकानात जाऊन आणाल पण किती वेळ? किती दिवस? जर दुकानदाराला सामान नाही मिळाला तर ?? पुन्हा सरकार दोषी .. मग मागणी तसा पुरवठा करा नाही तर मोर्चा, समाजकंटक तयारच जाळपोळ करायला.

असो. हा अतिरेकी विचार वाटेलं पण वेळीच सावध व्हा .
आजी म्हणायची वास्तु कायम “तथास्तु” म्हणत असतो म्हणून काहीही अती करू नये.
इतरांसाठी नाहीं पण आपल्यासाठी, मुलांसाठी तरी काळजी घ्यावी.

Leave a Reply