व्यायामाचे ३० फायदे

रोजची कितीही धावपळ असेल, श्रम असतील तरी व्यायामासाठी वेगळा वेळ द्यायलाच हवा. व्यायाम ही कायम करायची गोष्ट आहे; कधीतरी करुन सोडून देण्याची नाही हे स्पष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. आपल्याला व्यायाम हा आयुष्यभर करायचा आहे तरच आपले आरोग्य औषध गोळ्यांशिवाय टिकून राहील.
१) व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच.

२)  व्यायाम करणार्‍यांची उर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात.

३) कमी उर्जेमध्ये, कमी वेळेमध्ये काम करण्याची क्षमता त्यांच्या विकसित झालेली असते.

४) कोणत्याही गोष्टीचा आळस येत नसल्यामुळे त्यांना कोणतेही काम सोपेच वाटते.

५)  त्यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते.

६) व्यायाम करणार्‍या व्यक्तीची हाडे मजबूत असतात.

७) व्यायामामुळे स्नायूंची ताकद वाढून व्यक्तीच्या कार्यक्षमतेत प्रचंड वाढ होते. 

८) व्यायामामुळे शरीरातील अनेक प्रकारच्या  वेदनां व पीडा दूर होतात.

९)  पडणे, धडपडणे, मुरगळणे, आखडणे, करक लागणे अशा गोष्टींचा त्रास त्यांना होत नाही.

१०) व्यायाम करणार्‍याचे शरीर सुडौल असते. उंची, जाडी, वजन यांचा योग्य समतोल त्यांच्या शरीरात साधलेला असतो.

११) नियमित व्यायाम करून शारीरिक सौंदर्य प्राप्त करता येतेच. 

१२) नियमित व्यायाम करुन बेडौल शरीर सुडौल-आकर्षक करता येते. 

१३) नियमित व्यायाम करणारयांची त्वचा नितळ असते . 

१४) व्यायाम करणार्‍यांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असते.

१५) नियमित व्यायाम करणारे कोणत्याही आजारांना सहज बळी पडत नाहीत . 

१६) व्यायाम करणार्‍याचे हृदय निरोगी असते. त्यामुळे हृदयाचे ठोके सामान्य असतात. 

१७) नियमित व नियोजन बध्द व्यायामाने हदयाची-फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.

१८) त्यांचा श्‍वास चांगला असतो. रक्तवाहिन्या निर्दोष असतात. त्यामुळे त्यांना हृदयविकारापासून मुक्ती मिळते. 

१९) नियमित व्यायाम करणारयांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते.

२०) व्यायामाने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

२१) शरिरारील कित्येक आजारांसाठी व्यायाम हे महत्वाचे औषध आहे. 

२२)  व्यायाम करणार्‍यांना दैनंदिन ताणतणावाचा चांगला सामना करता येतो

२३)  नियमित योग्य व्यायामाने मनाची एकाग्रता वाढेल, ताणतणावांचं नियोजन साध्य होईल. 

२४)  त्यांचा आत्मविश्‍वास आणि आनंद या दोन्हीत वाढ झालेली असते. 

२५) नियोजनबध्द व्यामामूळे डिप्रेशन नैरश्यासारख्या रोगांपासून सहज मुक्ती मिळते.

२६) नियमित व्यायाम करणारयांची जठराग्नी प्रदिप्त होते, अन्नाचे योग्य पचन होते, मल, मुत्र, स्वेदाचे योग्य प्रकार निस्सरण होते. 

२७) योग्य व्यायाम आणि योग्य प्रमाणात आहार घेतल्यास वजन घटण्याची शक्यता असते

२८) व्यायामामुळे चयापचयाची गती वाढते. अन्नाचे अधिक चांगले पचन होते. चरबी साठण्याचे प्रमाण कमी होते.

२९) व्यायामाने मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तशर्करा कमी होण्यास आणि ती नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

३०) व्यायामाचा महत्त्वाचा परिणाम मेंदू व मज्जासंस्थेवर होतो. सर्व शरीराचे नियंत्रण करणाऱ्या मेंदूला भरपूर रक्तपुरवठा होत राहिल्यामुळे तो शरीरातील प्रत्येक अवयवाकडून परिणामकारक कार्य करवून घेतो.

३१) नियमित व्यायामाने लैंगिक क्षमताही टिकून राहतात. त्याचा परिणाम वैवाहिक जीवनाचा आनंद दीर्घ काळ मिळण्यासाठी होतो.

३२) नित्यनियमाने व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते. कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते.

३३) बैठी जीवनशैली असलेल्या लोकांपेक्षा व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी असते. 
३४) फक्त एक तास व्यायाम केला असता आठ किंवा त्यापेक्षा जास्त काळ बैठेकाम करण्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका टळतो.

३५) आयुष्याचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतरही ज्या व्यक्ती रोज 50-60 मिनिटे योग्य व्यायामासाठी देतील त्यांना शतायुषी होण्याचे भाग्य नक्कीच लाभेल,

बदलत्या जीवनशैलीत शारीरिक श्रमांना दुय्यम लेखून, बैठ्या कामांनी विनासायास जास्तीत जास्त आर्थिक यश मिळवणं हे ध्येय बाळगलं जातं. रोजच्या कामातले मर्यादित स्वरूपातले शारीरिक श्रम आणि झेपेल तेवढा मर्यादित; पण नियमित व्यायाम करून नवी आरोग्यशैली अंगीकारणं हेच सर्वस्वी उचित ठरेल. जोपर्यंत शरीर काम करते आहे तोपर्यंत काही ना काही व्यायाम करीतच राहिले पाहिजे.

Leave a Reply