भारतीय संस्कृती ठसवत गेले ,
कुंकू सौभाग्यवतिचे लेणे ,
हेच स्वप्न उराशी बाळगून
बालपण आपले सरत गेले
रोज आरशासमोर उभी राहता
सदैव आपले कुंकू पाहता
काळावर काळ सरता , रावांशी जीवनाचे नाते जुळता ,
सौभाग्यवती चंद्रकांत रावांशी झाले म्हणता ,
आले आता खर्या अर्थाने कुंकू मिरवता ,
माझ्या कपाळीच कुंकू , काय त्याला मान ,
जेथे जाई तेथे होई आदर सन्मान
मिळालेल्या प्रेमापोटी मन माझे आनंदून गेले ,
कन्यारत्न जन्मा येता , आईत्वाच्या सुखाला न्हाऊन गेले
अचानक घेतली काळाने काळाने उडी ,
घेऊन गेली कुंकवाची लेणी ,
सारच सरल, सगळाच संपल , चहूकडे अंधाराच जाल पसरलं
त्या कुंकवाच्या गाठोड्यात मान-सन्मान निघून गेले ,
काहीहो चूक नसताना अपशकुनी माणू लागले
‘विधवा ‘ शब्द ऐकून कान तितले ,
त्या चिमण्या बाळाला घेऊन काय करू , असे प्रश्न उरले
सर्व दु:ख उराशी बांधले , सातत्याने उभी राहिले
बाल पाखराच्या चोचीत दाने टाकत राहिले
सार्या समाजापुढे एकाच मागण
जगू द्या हक्काने , विश्वासाने या विधवांना हेच सांगण