रेणुकादेवीची आरती

माहूर गडावरी गं , माहूर गडावरी गं , तुझा वास |
भक्त येतात हो , दर्शनास ||धृ ||
पिवळे पातळ गं , पिवळे पातळ , बुट्टेदार |
अंगी चोळी हिरवीगार २ …
पितांबराची गं , पितांबराची खोउनी कास |
भक्त येतात हो , दर्शनास २… ||२||
बिंदी बिजावरा गं , बिंदी बिजावरा , भाळी शोभे |
काप बाळ्या न , बेल झुले २ … |
हिच्या नथेला गं , हिच्या नथेला , हिरवे घोस |
भक्त येतील हो , दर्शनास २… ||३||
जाई जुईची गं , जाई जुईची , आणली फुले |
भक्त गुंफिती , हार तुरे २ … १
हार घालिते गं , हार घालिते , अंबे तुला |
भक्त येतात हो , दर्शनास २… ||४||
हिला बसायला गं , हिला बसायला , चंदनाचा पाट |
हिला जेवायला चांदीचे ताट २…
पुरळ पोळीचा गं , पुरळ पोळीचा , भोजन तुला |
मुखी तांबुल , देते तुला २ … |
खणा नारळाची गं , खणा नारळाची, ओटी तुला |
भक्त येतात हो , दर्शनास २… ||५||
माझ्या मनीची गं , माझ्या मनीची , मानसपूजा |
प्रेमे अर्पिली , अष्टभुजा २…|
मनोभावाने गं ,मनोभावाने , पूजिती तुला |
भक्त येतात हो , दर्शनास २… ||६||

Leave a Reply