म्हातारपण

म्हातारपणाला नाव छान ,
कोणी म्हणत संन्यासाश्रम ,
कोणी म्हणतं वानप्रस्थाश्रम ,
मी म्हणतो आनंदाश्रम,

म्हातारपणात कसं राहायचं ,
घरात असेल तर आश्रमासारखं ,
आश्रमात असेल तर घरासारखं ,

कशातच कुठे गुंतायचं नसतं ,
जुन्या आठवणी काढायच्या नाही ,
‘आमच्या वेळी’ म्हणायचं नाही ,
अपमान झाला समझायचं नाही ,
उगाच लांबण लावायची नाही ,

सुखाची भट्टी जमवत जायच,
साऱ्यांशी दोस्ती जुळवत राहायचं ,
राग लोभाला लांब पळवायचं ,
आनंद सारखा वाटत जायचं ,

म्हातारपण सुद्धा छान असतं ,
लेन्स इम्प्लांट ने स्वच्छ दिसतं ,
नव्या दातांनी सहज चावता येतं ,
कान यंत्राने ऐकु येतं ,

पार्कात जाऊन फिरुन यावं ,
क्लबात जाऊन पत्ते कुटावं ,
देवळात जाऊन भजन करावं ,
टी.व्ही. मधल्या सिरियल बघावं ,

मुलांसमोर गप्प बसावं ,
नातवंडांशी खेळत रहावं ,
बायकोबरोबर भांडत जावं,
मित्रांबरोबर बोलत सुटावं,

जमेल तेंव्हा टूर वर जावं ,
लायन रोटरी अटेण्ड करावं ,
वेळ असेल तर गाण गावं ,
कंटाळा आला झोपुन जावं,

छान रंगवावी सुरांची मैफल ,
मस्त जमवावी जेवणाची पंगत ,
सुरेल जुळवावी गप्पांची संगत,
लुटत रहावी जगण्याची गम्मत,

स्वाद घेत, दाद देत ,
तृप्त मनानं आनंद घेत ,

हळुच निघुन जावं ,
पिकलं पान गळुन पडावं …!!!!

Leave a Reply