मैत्रीण

आयुष्यात स्वतःची एक,मैत्रीण असावी.”
कुठलाही शिष्ठपणा न करता, दिलखुलास असावी,
पळस पानी थेम्बा सारखी,ती नितळ असावी;
जी कायम अबोध बालका सारखी,हसत असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिच्या सोबत संध्याकाळ,एक “स्पेशल” असावी,
पण ती स्वतःकायम,”सोशल”असावी;
मैत्री नात्यात “नथिंग ओफ़िशिअल “असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिची चाहूल, ऋतू पालवी सारखी असावी,
जिची सोबत श्रावण-सरी,ओली असावी,
जिच्या केस घसरणीत,पानगळ असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिच्या नाती,सर्व धागी अतूट असावी,
जिची हास्य खळखळ,बेछूट असावी;
जिची मन भावना,रेशीम कोमल असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जी माझ्या संगतीस,कायम आतुर असावी,
जिला माझ्या सहवासाची,खूप ओढ असावी;
माझ्या जोक्स ला कायम, रसिकतेने हसावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कधी माझ्या न बोलण्याने,अलगद शोकाकुल व्हावी,
माझा अबोल्याची छटा चेहऱ्यावर झळकावी
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी,
तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी;
माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी..
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी,,,,,,,

Leave a Reply