मनाचा डाएट

जेव्हा आपलं वजन वाढतं, फिगरवर परिणाम होतो, बीपीच्या गोळ्या सुरु होतात,शुगर डिटेक्ट होते किंवा कधी कधी स्वत:ची आगाऊ काळजी म्हणुन सुद्धा किंवा कधी कधी तर चक्क फॅशन म्हणुन आपण डाएट करतो.पण कधी आपण आपल्या मनाचे डाएट केलयं का?

“आपल्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव आपल्या शरीरावर असतो”

म्हणून आपल्या मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे जेवढी शरीराला आहे बरोबर ना…?

मानसिक डाएट म्हणजे काय करायचं ??

  • मानसिक डाएट म्हणजे आपले विचार आधिकाधीक फिल्टर्ड कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा,
  • *तेलकट-तुपकट* ( फडतुस-निगेटिव्ह ) विचार आपण करणार नाही,
  • *अती-गोड* टाळायचं म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसर्याला विसरुन जाणारे विचार करायचे नाही
  • दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करायचं
  • दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे  कुचके-नासके विचार फेकुन देऊ,
  • *स्वातंत्र्य* आणि स्वैराचार यातला फरकं ओळखुन स्वत:ला “रीझनेबल” बनवायचं
  • दुसर्‍यांच्या मतांचा आदरकरायचा
  • दुसर्‍यांना वेळ देणं, संवाद चालु ठेवणं
  • मनाचं वातावरण नेहमी हलकं फुलकं ठेवणं,
  • एकमेकांच्या अस्तित्वाची जाणिव ठेवणं

मनं पण थकतं हो कधीकधी, त्याला सुद्धा इंस्टंट एनर्जी मिळते  ती फक्त एक कप काॅन्फिडन्सच्या चहाने,

या डाएट चे इफेक्ट्स खुप मस्त असतातं.

  • लोकं प्रेमात पण पडु शकतात तुमच्या.
  •  तुमच्या चेहर्‍या वरचा ताण कमी होतो,
  • तुम्ही यंग वाटू लागता, टेंन्शन कमी होतात लाईफ पाॅपकाॅर्न इतकंच हलकं होतं.

वास्तविक, मन ओके असेल  तरचं लाईफ ओके असतं, नाही कां? …

Leave a Reply