फोनचा हँगओव्हर

ज्याप्रमाणे मेंदू कधी कधी गंडतो त्याचप्रमाणे स्मार्टफोन्सही अनेकदा हँग होतात. आणि हा अनुभव बहुतांश कंपन्यांच्या स्मार्टफोन्सच्या बाबतीत येतो. काही काम करीत असताना फोन हँग होणं, मग तो गरम होणं किंवा अनेकदा आपोआप मध्येच रिस्टार्ट होणं असे प्रकार बरेचदा घडतात. चांगल्या कंपनीचा असला तरी हँग होणं ही बाब फारच कॉमन आहे. पण हे नेमकं होतं तरी कशामुळे?

स्मार्टफोन्स हँग होण्यामागे काही कारणं आहेत-

 •  एकाच वेळी एकापेक्षा अनेक अ‍ॅप्स चालू असतील तर फोन हँग होऊ शकतो.
 •  एक्स्टर्नल मेमरीऐवजी फोन मेमरीमध्ये अ‍ॅप्स इन्स्टॉल होत असतील तर
 •  इन्टर्नल मेमरी तसेच रॅम जर का नेहमी भरलेली असेल तर.
 •  मेमरी कार्ड किंवा एक्स्टर्नल मेमरी फुल असेल तर.
 •  फोन जेव्हा स्टँडबाय मोडवर असतो तेव्हा वापरल्या जाणाऱ्या थीम्सची साइज जर का जास्त असेल तर.
 •  कुकीज, कॅशे मेमरी, लॉग फाइल्स वेळोवेळी डिलिट केल्या नसतील तर.
 •  फोनमध्ये खूप सारी अ‍ॅप्स असतील तर.
 •  फोनच्या रॅम, प्रोसेसरच्या क्षमतेपेक्षा मोठय़ा फाइल्स चालवणं.
 •  एकदा कारणं कळली की मग नेमकं काय करायचं हे जरा स्पष्ट होतं.
 •  नेहमी अ‍ॅप इन्स्टॉल करताना ती एक्स्टर्नल मेमरीमध्ये करा. जेणेकरून जेव्हा अ‍ॅप्स रन होतील तेव्हा टेम्पररी डेटा स्टोअर होण्यासाठी इन्टर्नल मेमरी मोकळी राहील. याचा आणखी एक फायदा असा तो म्हणजे इन्टर्नल मेमरी मोकळी राहिल्याने एकापेक्षा अधिक अ‍ॅप्स सहज सुरू राहतील.
 •  विनाकारण इन्स्टॉल केलेली निरुपयोगी अ‍ॅप्स डिलिट करणं हा सगळ्यात उत्तम पर्याय. फोन हँग झाल्यानंतर रिस्टार्ट झाला की सर्वात आधी निरुपयोगी, फार कमी वेळा वापरली जाणारी अ‍ॅप्स ओळखून त्यांना सरळ बाहेरचा मार्ग दाखवायचा.
 •  बॅकग्राउंडमध्ये सुरू असणाऱ्या प्रोसेसेस बंद करणं. या प्रोसेसेस विनाकारण फोनची मेमरी वापरतात. बॅटरी खर्च होते हे दुसरं कारणही आहेच. अँड्रॉइड फोन्समध्ये इनबिल्ट टास्क मॅनेजर असतो. समजा तो वापरायचा नसेल तर अ‍ॅडव्हान्स्ड टास्क किलर किंवा इझी टास्क किलरसारखी अ‍ॅप्स हे काम नक्की करू शकतील.
 •  कुकीज, कॅशे फाइल्स डिलिट करण्याचा पर्याय नेहमी सांगितला जातो.
 •  याशिवाय इन्टर्नल मेमरीमधला डेटा वेळोवेळी मेमरी कार्डमध्ये घ्यावा किंवा क्लाउड बॅकअपचा पर्याय वापरावा. जेणेकरून फोनची इन्टर्नल मेमरी मोकळी राहील.

Leave a Reply