🌸 सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच
नसत हसून हसून जगायच असत.
🍁 रातराणी सांगते अंधाराला घाबरायच
नसत काळोखात ही फुलायच असत.
🌹 गुलाब सांगतो येता जाता रडायच
नसत काट्यात सुद्धा हसायच असत
🌼 बकुळि म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच
नसत गुणाच्या गंधाने जिंकायच असत
🌷 कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच
नसत संकटाना बुडवून फुलायच असत.
2017-03-29