प्रेम

प्रेम बीम म्हणजे काय फक्त मोठाल्या गिफ्ट्स बिफ्ट्स देणं नसतं…

त्याच्या शर्टाचं तुटलेलं बटण शिवणं म्हणजे सुद्धा प्रेमच असतं….

तीच्या सोबत बसून मटार सोलणं म्हणजे सुद्धा प्रेमच असतं….

कितीही उशीर झाला तरी त्याच्यासाठी जेवायला थांबणं सुद्धा प्रेमच असतं

रिकाम्या बाटल्या भरून त्याने फ्रीजमध्ये ठेवणं सुद्धा प्रेमच असतं….

रविवारी वेळ काढून त्याचं कपाट लावणं सुद्धा प्रेमच असतं….

रविवारी तिच्यासाठी त्याने चहा बनवणं सुद्धा प्रेमच असतं…

आधी तिने आवरून त्याच्यासाठी गिझर लावणं सुद्धा प्रेमच असतं…

त्याने मोबाईल चार्ज झाल्यावर तीचा मोबाईल चार्जिंगला लावणं सुद्धा प्रेमच असतं….  

गोड बातमी त्याला हळूच कानात सांगणं सुद्धा प्रेमच असतं…..

तिला whatsapp वर “दुपारची गोळी घेतलीस का?” विचारणं सुद्धा प्रेमच असतं…

डोहाळ जेवणात त्याच्यासोबत फोटो काढतांना लाजणं सुद्धा प्रेमच असतं….

… तिला operation साठी आत नेल्यावर त्याने देवाला हात जोडणं सुद्धा प्रेमच असतं…
प्रेम बीम म्हणजे काय फक्त तरुणांचंच नसतं…

साठीनंतर तीचा हात धरून रस्ता क्रॉस करणं सुद्धा प्रेमच असतं….

प्रेम बीम म्हणजे काय फक्त तरुणांचंच नसतं…

त्याला जास्त चावता येत नाही म्हणून पोळी कुस्करून देणं सुद्धा प्रेमच असतं….

प्रेम बीम म्हणजे काय फक्त तरुणांचंच नसतं…

तिची देवपूजा सुरु असतांना त्याने फुलं आणून देणं सुद्धा प्रेमच असतं…

प्रेम बीम म्हणजे काय फक्त तरुणांचंच नसतं…

दुसऱ्या गुलाबजामला हात लावताच त्याला तिने रागावणं सुद्धा प्रेमच असतं….

Leave a Reply