नाती

काही नाती म्हणजे जणू धुंद मोगरा…… पानोपानी फुलुन येई येता चैत्र साजरा!….

काही नाती म्हणजे जणू टपोरा गुलाबच….. भाव खाऊन जातात प्रत्येक वेळेसच!……..

 काही नाती म्हणजे सोनचाफा अन् नागचाफा……. नाजुकपणे अलगद त्यांना गुंफा……!

काही नाती म्हणजे भरभरून फुलणारी बकुळ…… पुन्हा नव्याने मनाला घालती भुरळ!……

 काही नाती म्हणजे जाई जुई चमेली……. इवलेसे क्षण जपताना होती नवनवेली!…….

 काही नाती म्हणजे सदाफुली अन् अबोली…… समजेना मनस्वी त्यांची देहबोली……!

काही नाती म्हणजे जर्द पिवळी शेवंती…… समर्पणाचे भाव तेथे  नेहमी असती…..!

काही नाती म्हणजे गणेश प्रिय जास्वंदी….. अस्तित्वात त्यांच्या होती चित्तवृत्ती आनंदी……!

 काही नाती म्हणजे फुललेले निशिगंध……. मनात सदैव असे त्यांचा सुगंध……!

काही नाती म्हणजे मोहरलेली रातराणी……. प्रसन्न करती त्यांच्या मुग्ध आठवणी…….!

 काही नाती म्हणजे कोरांटी काटेरी……  सल सदैव रूते त्यांच्या अंतरी……!

काही नाती म्हणजे रानफुले ज्यांना नसे सुवास …… परंतु  हृदयी त्यांचा राहे अखंड वास…..!

काही नाती म्हणजे चिखलातील कमळ…… बिकट परिस्थितीत देई जगण्याला बळ……!

 काही नाती पारिजातकाचे लेणं……. त्याच्या संगे जगताना लाभे अभंग लेणं…..!

 असे नात्याचे सुगंधी सुमन वेचायचे……,  सुगंधी नात्याचे रेशीम धागे गुंफायचे…..!

Leave a Reply