नमस्कार ……….
वृद्ध व्यक्तीचा प्रवास हा हळूहळू दक्षिण दिशेला, म्हणजे यमलोकाकडे (मृत्यूकडे) होत असल्याने तिच्या शरीरातून रज व तम लहरींचे प्रक्षेपण मोठ्या प्रमाणावर होऊ लागते. अशी वृद्ध व्यक्ती समोर आल्यावर तरुण व्यक्तीच्या शरीरावर त्या लहरींचा परिणाम होतो व त्या दोघांमध्ये सूक्ष्म-चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्यामुळे तरुण व्यक्तीचे पंचप्राण वर उचलले जातात. अशा प्रकारे अचानक पंचप्राणांना मिळालेल्या गतीमुळे व्यक्तीला त्रास होण्याची शक्यता असते. जेव्हा तरुण व्यक्ती वृद्ध व्यक्तीला नमस्कार करते, तेव्हा तरुण व्यक्तीतील सुषुम्नानाडी काही प्रमाणात जागृत होते व तरुण व्यक्तीतील सत्त्वगुण वाढू लागतो. त्यामुळे तिच्यातील रज व तम गुणांवर सत्त्वगुणाचा प्रभाव होऊ लागतो व तिचे प्राण पूर्वस्थितीत येतात. यासाठी वृद्ध व्यक्तीचे आगमन होताच तिला लहानांनी नमस्कार करण्याची पद्धत आहे.’
वयाने, मानाने थोर असणार्या व्यक्तींचे पाया पडण्याची रीत फार पूर्वीपासून आहे. हिंदु धर्मांप्रमाणे मोठ्यांप्रती आदर दर्शविण्यासाठी चरणस्पर्श करणे उत्तम मानले जाते. चरणस्पर्शाचे मानसशास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारणंही आहेत.
1) वाकून पाया पडण्याने विनम्रता येते आणि मनाला शांतीदेखील मिळते.
2) पाया पडल्यावर मोठे व्यक्ती आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा हात आमच्या डोक्यावर स्पर्श करतात. या प्रकारे त्या पूजनीय व्यक्तींची सकारात्मक ऊर्जा आशीर्वादाच्या रूपात आमच्या शरीरात प्रवेश करते आणि आमचा आध्यात्मिक व मानसिक विकास होतो.
3) शास्त्राप्रमाणे दररोज थोर मोठ्यांच्या पाया पडण्याने दीर्घ आयुष्य व उच्च शिक्षण प्राप्त होतं आणि प्रसिद्धीत वाढ होते.
4) शरीरात उत्तर ध्रुव म्हणजे डोक्यातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करून दक्षिण ध्रुव म्हणजे पायाकडे प्रवाहित होते. आणि पायात ही ऊर्जा अमर्यादित प्रमाणात स्थिर होऊन जाते. म्हणूनच पायाला हात लावून नमस्कार केल्याने ही ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते.
5) असा विश्वास आहे की पायाच्या अंगठ्याहून सुद्धा शक्तीचा संचार होतो.
6) असे म्हणतात की थोर मोठ्यांच्या नियमित पाया पडल्याने प्रतिकूल ग्रहदेखील अनुकूल होऊन जातात.
7) वाकून पाया पडणे हा एकाप्रकारे शारीरिक व्यायामदेखील आहेत. वाकून नमस्कार करणे, गुडघ्यावर बसून नमस्कार करणे किंवा साष्टांग दंडवत घातल्याने शरीर लवचिक होतं.
8) नमस्कार करताना पुढे वाकल्याने डोक्यात रक्त प्रवाह वाढतो जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
9) वाकून नमस्कार करण्याने आमच्यातला अहंकारदेखील कमी होतो.
10) काही लक्ष्य ठेवून मोठ्यांच्या पाया पडल्याने लक्ष्य प्राप्तीसाठी बळ मिळतं.
यामुळेच लहान मुलांना मोठ्यांच्या पाया पडण्याचे नियम आणि संस्कार दिले जातात.
2017-02-26