घराचा दसरा काढला असालच …. आणि आयुष्याचा दसरा ? तो कधी काढणार ?
हसू येईल जरा वाचून …. पण आयुष्याच गणित असते , आयुष्याच रसायन असते… आयुष्याची दिवाळी पण असते… पण आयुष्याचा दसरा काढणे हि concept प्रथम च ऐकली असेल नाही… ?
आज एक काम करा…
सर्वात आधी मनात जमलेले वैफल्य,निराशा, चिंता यांची रद्दी काढून टाका…. भूत काळ विसरून वर्तमानाला सामोरे जायला तयार व्हा….
दुसरं महत्वाचं काम म्हणजे पारंपारिक-मागासलेले खुळचट विचार यांची जळमटं काढून मनमोकळी प्रसन्न हवा प्रत्येक खोलीतून वाहू द्या….
आयुष्यात जमा झालेल्या त्रासदायक रक्तपिपासू व्यक्ती अन् निरर्थक नात्यांना कचर्याप्रमाणे झाडून टाका, चांगल्या पण नादुरूस्त नात्यांना माफीची दुरूस्ती द्यायला विसरू नका… आपल्या मनाच्या श्रीमंतीसाठी मनापासून झगडा…..
तुमच्या दृष्टिकोनाच्या काचांवर बसलेली गैरसमज, अंधश्र्ध्देची धूळ झटकून आधुनिक पुढारलेल्या विचारांचा स्वच्छ प्रकाश मनाच्या कोपऱ्या कोपर्यात पसरू द्या….
धैर्या-शौर्याच्या furniture ला लागलेली भीतीची-कमकुवतपणाची वाळवी काढून टाकण्यासाठी आत्मविश्वासाचं कीटकनाशक फवारा….
मनाच्या भिंतीना सुंदर स्वप्नांचे रंग द्या… त्यावर प्रेरणांचे व सुंदर आठवणींचे wall pieces लावा ज्यांच्या कडे बघून सतत तुम्ही उल्हासात्मक आयुष्य जगण्यासाठी तयार राहाल….
आणि सर्वात शेवटी मस्त आनंदाचा air freshener मारून …. आणि पुन्हा नव्याने आयुष्याला सामोरे जा….
लक्षात ठेवा जसा आपल्या घरचा आपल्यालाच काढावा लागतो, तिथे बाहेरचं कुणी हि मदतीला येत नाही… तसाच आपापल्या आयुष्याचा दसरा ही स्वतःला च काढावा लागतो …….
ठीकंय तर मग यावर्षी सर्वजण मनाचा-आयुष्याचा असा दसरा नक्की काढा……आणि आत्मशक्तीच्या विविध रूपांची पूजन करा…….