जोगवा

अनादी निर्गुण प्रगटली भवानी | आईचा जोगवा , जोगवा मागेन ||धृ ||
मोह महिषासुर मर्दानी लागून | त्रिविध तापाची करावया झाडणी
भक्त लागोनी धावासी निर्वाणी | आईचा जोगवा , जोगवा मागेन ||धृ || ||१||
द्वेत सारून माळ मी घालीन | हाती बोधाचा झेंडा मी धरीन
भेद रहित वारीस जाईन | | आईचा जोगवा , जोगवा मागेन ||धृ || ||२||
नवविध भक्तीचा करीन नवरात्रा | करून वारी मागेन ज्ञानपुत्रा
धरीन सद्भाव अंतरीचा मित्रा | दंभ संसार सोडीन कुपात्रा ||३||
पूर्ण बोधाची घेईन परडी | आशा तृष्णेचा पाडीन दुरडी
मनो विकार करीन कुर्वडी | अद्भुत रसाची भरीन दुरडी ||४||
आता साजणी झाले मी नि:संग | विकल्प नवऱ्याचा सोडियला संग
कामक्रोध हे झाडीयले मांग | केला मोकळा मार्ग सुरंग ||५||
ऐसा जोगवा मागुनी ठेवला | जाऊनी महाद्वारी नवस म्या फेडीला
एका जनार्दनी एकपणे देखिला || जन्म मरणाचा ssssफेरा चुकविला ||६||
अनादी निर्गुण प्रगटली भवानी | आईचा जोगवा , जोगवा मागेन ||धृ ||

Leave a Reply