*कुणाला आपला कंटाळा येईल*
*इतकं जवळ जाऊ नये .*
*चांगुलपणाचे ओझे वाटेल*
*इतके चांगले वागू नये .*
*कुणाला गरज नसेल आपली*
*तिथे रेंगाळत राहू नये.*
*आपण मात्र आयुष्य भर*
*कुणाला झिडकारू नये .*
*आपुलकीचा विणला गोफ*
*आपण कधीच उसवू नये .*
*नशीबाने जुळलेली नाती*
*जपावी पण तोडू नये .*
*गोड बोलणे गोड वागणे*
*कुणास अवघङ वाटू नये .*
*जवळपणाचे बंधन होईल*
*इतके जवळचे होऊच नये .*
*सहजच विसरून जावे सारे*
*सल मनात जपू नये .*
*नकोसे होऊ आपण*
*इतके आयुष्य जगूच नये .*
*हवे हवेसे असतो तेव्हाच*
*पटकन दूर निघून जावे .*
*आपले नाव दुसऱ्याच्या ओठी*
*राहील इतकेच करून जावे…*