चिलीम

ॐ साई राम

आजकल आपल्या श्री सद्गुरू साईनाथ महाराजांच्या पदयात्रा पालखीत व इतर सद्गुरूंच्याही पालखीत व मंदिरात चिलीम पिण्याचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे.
आज या चिलीम बद्दल थोडी माहिती बघूया, बाबा जेव्हा चिलीम पित असत,तेव्हा त्यामध्ये फक्त आणि फक्त तंबाखू असत व कधी कधी तर मोकळी चिलीम दैवी चमत्काराणी  पित असत,पण त्यांनी भक्तांना “बाबांनो तुम्ही नेहमी चिलीम पित जा” असा कधीच उपदेश केला नाही बाबा अंतर्यामी होते,ज्या भक्ताला दमा, खोकला,छातीचे,फुफुसाचे आजार होते त्यांनाच चिलीम पिण्यास दिली,काही भक्तांनी पहिल्यांदा नकार दिला पण इतर भक्तांनी त्यांना समजवले तेव्हा त्यांनी चिलीम पिली आणि ती ही फक्त बाबांबरोबर एकदाच नंतर त्या भक्ताला त्या चिलीमच्या झुरक्यामुळे खूप फरक पडला (आजारावर),पुन्हा कधीच बाबांनी त्या भक्ताला चिलीम पाजली नाही व पिण्यासही सांगितले नाही.बाबा चिलीम सर्वांना देत नव्हते.
पण आज काही नशेबाज भक्तांनी स्वतःच्या नशेसाठी “बाबांचा प्रसाद” म्हणून याची प्रथा चालू ठेवली,व नवीन भक्ताला याची सवय लावीत आहे आजही शिर्डीत गुरुवारी शेजारती वेळेस बाबांना जी चिलीम देतात,त्या मध्ये फक्त तंबाखू असते, “गांजा,अफू व इतर नशीली पदार्थ” नसतात कपया सर्वांनी आपल्या बाबांचे जिवंत हृदय असलेले “श्री साईसतचरित “ हे मनापासून वाचा,या मध्ये हे सांगितले आहे.

आज चरित्र न वाचता जो तो बाबांच्या लीला आपल्या मनाप्रमाणे(स्वार्थासाठी) इतरांना सांगत आहे व बाकीचे ऐकत आहे.म्हणून कृपया साई चरित्र स्वतः वाचा. आणि हो साईबाबा,स्वामी समर्थ,गजानन महाराज व इतर  सद्गुरू चिलीम पित असले तरी त्यांची अध्यात्मिक पातळी खूप श्रेष्ठ आहे,आजही जे नागाबाबा,हिमालयातील साधू चिलीम पित असले तरी ते अध्यात्मिक दृष्ट्या वरची पातळीवर आहेत. आणि सर्वात शेवटी बाबा चिलीम पितात बोलता पण ते चमत्कार देखील करत होते,पेटत्या आगीत,उकळत्या पाण्यात हात घालीत होते.

आज चिलीम पिणाऱ्यामध्ये आहे का ही श्रेष्ठता ?

कृपया माझ्या सत्यमाहिती मुळे कोणाचे मन दुखावले असेल तर, लहान भाऊ समजून क्षमा करावी.
बाकी,

अल्लाह मलिक !!
।। ॐ साई राम ।।

।। ॐ श्री साईनाथाय नमः ।।

Leave a Reply