घर

ज्या घरांत ग्रंथ नाहीत.,
त्या घरांत शांत नाही.
ज्या घरांत पूजा नाही,
त्या घरांत मजा नाही.
ज्या घरांत ध्यान नाही,
त्या घरांत ज्ञान नाही.
ज्या घरांत आरती नाही,
त्या घरांत किर्ती नाही.
ज्या घरांत ज्ञानी नाही,
त्या घरांत शहाणी नाही.
ज्या घरांत अभंग नाही ,
त्या घरांत भक्तिरंग नाही.
ज्या घरांत देवभाव नाही,
त्या घरांत देव राहात.नाही. ..

ज्या घरांत आचरण नाही,
त्या घरांत उच्चारण नाही.
ज्या घरांत शांती नाही,
त्या घरांत क्रांती नाही.
भाव नसेल तर भक्ति सुध्दा खेळण आहे,
भाव असेल तर खेळण सुध्दा भक्ती आहे.
श्रध्दा नसेल तर तीर्थ सुध्दा नदी आहे,
श्रध्दा असेल तर नदी सुध्दा तीर्थ आहे.
साधना नसेल तर बोध सुध्दा बोल आहे,साधना असेल तर बोल सुध्दा बोध आहे.
अनुभव नसेल तर देव सुध्दा प्राणी आहे,अनुभव असेल तर प्राणी सुध्दा देव आहे .
पुरुषार्थ नसेल तर साध्य सुध्दा असाध्य आहे, पुरूषार्थ असेल तर असाध्य सुध्दा साध्य आहे.
नम्रता नसेल तर शिष्य सुध्दा सिसा आहे,नम्रता असेल तर सिसा सुध्दा शिष्य आहे.
विवेक नसेल तर विचार सुध्दा संसार आहे,विवेक असेल तर संसार सुध्दा विचार आहे.
वैराग्य नसेल तर संन्यासी सुध्दा गृहस्थाश्रमीआहे,वैराग्य असेल तर गृहस्थाश्रमी सुध्दा संन्यासी आहे.
आवड नसेल तर शिक्षण सुध्दा शिक्षा आहे,आवड असेल तर शिक्षा सुध्दा शिक्षण आहे.
तहाण नसेल तर अमृत सुध्दा पाणी आहे,तहाण असेल तर पाणी सुध्दा अमृत आहे.
।। श्री स्वामी समर्थ ।।
!! जय साई !!⁠⁠⁠⁠

Leave a Reply