कुणीच कुणाच्या जवळ नाही
हीच खरी समस्या आहे
म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी
आणि आमावस्या जास्त आहे
हल्ली माणसं पहिल्या सारखं
दुःख कुणाला सांगत नाहीत
मनाचा कोंडमारा होतोय
म्हणून आनंदी दिसत नाहीत
एवढंच काय
एका छता खाली राहणारी तरी
माणसं जवळ राहिलीत का ?
हसत खेळत गप्पा मारणारी
कुटुंब तुम्ही पाहिलीत का ?
अपवाद म्हणून असतील काही
पण प्रमाण खूप कमी झालंय
पैस्याच्या मागे धावता धावता
दुःख खूप वाट्याला आलंय
नातेवाईक ,शेजारी ,कुटुंबातले
फक्त एकमेकाला बघतात
एखाद दुसरा शब्द बोलतात
पण काळजातलं दुःख दाबतात
जाणे येणे न ठेवणे , न भेटणे , न बोलणे
या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका
गाठी उकलायचा प्रयत्न करा
जास्त गच्च होऊ देऊ नका
धावपळ करून काय मिळवतो
याचा जरा विचार करा
बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा
आपल्या माणसांची मनं भरा
एकमेका जवळ बसावं बोलावं
आणि नेहमी नेहमी
तिरपं चालण्याच्या ऐवजी
थोडं सरळ रेषेत चालावं
” समुद्री चोहीकडे पाणी
आणि पिण्याला थेंबही नाही ”
अशी अवस्था झालीय माणसाची
यातून लवकर बाहेर पडा
चर्चा करून उपाय शोधा
नसता Convent , CBSE,
MBA , IIT , MS ,पॅकेज ,
Business & manegment skill
Second Home , Europe Tour
Registry , Dimond Jewellery
याला काहीही अर्थ ऊरणार नाही
माणसं अन माणुसकी नसलेली घरे
अन देव नसलेले देव्हारे
कितीही पॉश असले
तरी त्याचा काय उपयोग ?