कन्यादान

बाप आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण..

बाबा हा शहाळ्यासारखा असतो …

बाहेरून कितीही कठोर असला तरी ….

आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. …

कुठलीही मुलगी…

जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते….तर तो फक्त तिच्या वडिलांवर …

लेक जर घराचे सौख्य असेल तर…
त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो….

संस्कार देणारी आई असली तरी…
ते संस्कार जपणारा बाबा असतो.

संयम देणारी आई असली तरी…

खंबीर बनवणारा बाबाच असतो…

बोट धरून चालायला शिकवणारा बाबाच असतो …

लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो…

कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो…

पिकनिकसाठी पण पैसे बाबाच देतो…

shopping करताना आईने कमी किमतीचा dress काढला तर….
हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा dress घेणारासुद्धा बाबाच असतो. …

आईने काही काम सांगितले तर…. तिला दटावणारासुद्धा बाबाच असतो….

लेकीचे पहिले बोबडे बोल , तिने टाकलेले पहिले पाऊल , तिचे लाडिक वागणे,
तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि ….

लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा ….
आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो….

पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते….

लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराहि बाबाच !!!

आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच !!!

ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही. ..
आर्त धागे तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार.

आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून…
सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो….

आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना… आतून तुटणारा बाबाच असतो…

“दिल्या घरी सुखी रहा म्हणताना ”
… मनातून खचलेलाही बाबाच असतो…

असा हा बाबा त्याच्या लेकीचे सर्वस्व असतो…

आणि फक्त लेकच तिच्या बाबाचे मन ओळखू शकते. …

लेकीचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तिच्या बाबावर असतो….

लग्नानंतर मुलीचे नाव जरी बदलले तरी….
तिचे बाबा बरोबरचे नाते कधीच बदलत नाही ….

ती शेवटपर्यंत तिच्या बाबाची छोटी परीच असते….

एक गोंडस परी …

Leave a Reply