औषध

स्वभावाला औषध असतं,

पण ते रोज घ्यायच असतं..॥👏

अधिरातला ‘अ’ सोडून,

थोडं धिरानं घ्यायच असतं ॥👏

संतापातला ‘ताप’ सोडून,

मनाला संत करायच असतं ॥👏

मनातला हट्ट सोडून,

नात घट्ट करायच असतं॥👏

माझ्यातला मी सोडून,

तिच्यातला ‘ती’ला जपायच असतं ॥👏

आपलं बोलणं सोडून कधी,

समोरच्याचही ऐकायच असतं ॥👏

एकाच दिवशी नाही तरी,

हळू हळू बदलायचं असतं ॥👏

थोडं थोडं का होईना,

रोज प्रेम मात्र द्यायच असतं ॥👏

एकाचा राग दुसऱ्यावर न काढता,

समोरच्याला समजून घ्यायचं असतं ||👏

स्वभावाला औषध असतं,

फक्त ते रोज घ्यायच असतं !!👏

Leave a Reply