एक डाव आजीबाईचा !

वेळ..सकाळचे सहा….  धावता पाळता सिंघम स्टाइल मधे  सुटलेली म्हसवड ची बस पकडली….  विंडो सीट वर बसून, तिकीट काढून  झाल्यावर जी डुलकी लागली, ती संपली जेव्हा माझ्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला…. धूसर दृष्टीने पहिले…. सुरकुतलेले अशे हात माझ्या खांदयावर.. एक आजीबाई माझ्या सीट वर बसण्यासाठी आधार घेत होत्या. व्यवस्थित बसून झाले. अन् माझ्या बाजूला असलेल्या खिडकीतून आपल्या मुलाला मार्गदर्शन देत होत्या. “हं, पोहोचल्यावर फोन करते, तो पर्यंत काळजी घे सुनेची, मुलांना हव ते दे बाबा. अन् त्यात स्वतःची काळजी घ्यायला विसरू नकोस”.. दुसऱ्यांना संभाळताना स्वतःची पण काळजी करावी… “बर मी निघते” अस म्हणताच आजीबाईंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं . पांढरे केस, पांढरे पापण्या, पांढरी त्वचा अन्न त्यात पांढरी साडी, त्या माउलीचा जीव कसा बसा झाला. नंतर कळल, त्या आपल्या लेकी कडे जात होत्या. सासरी जात असल्यासारखे तिचे डोळे पानवळे. त्यांचा सोबत त्यांच्या हून वयाने लहान असलेली त्यांची वाहिनी असावी. मुलाला टाटा केल्यावर अचानक आजीबाईंना काहीतरी आठवल. मला सांगून त्यांच्या मुलाला बोलावून घेतल . नंतर म्हणल्या “अर, आपला  फ्रीज खराब झालाय ना… तर सूनबाईला दूध उकळायला आठवण करत जा.”

शेवटचा टाटा केला अन् बस चालू झाली. मनातल्या मनात विचार केला, आता ह्या आजीबाई देवाच नाव घेत शांत बसतील अन् आपण मस्तपैकी झोप काढूया. बसच इंजिन सुरू झाल्यानंतर एका मिंटाच्या आत आजीबाईंच्या तोंडच इंजिन सुरू झाल. आपल्या वाहिनीला – “तो दिलीप फार छान माणूस आहे (दिलीप कोण माहीत नाही मला)… त्या पद्धतीने सर्वांचा हिशेब  चुकता केला. बरेच गोष्टी म्हणाल्या, नमूद करण्याची ईछा नाही होत .आजीबाइंच इंजिन बंद होत नाहीए हे बघून माझ्या डोक्याच इंजिन गरम झाल. सहन तरी किती वेळ कराव ??    मी कानटोपी ला ताणून घेत झोपायचा निष्फळ प्रयत्न केला! ते ही न झाल्यावर मी त्या वाहिनी आजीबाईंना फ्री लुक्स द्यायचा प्रयत्न केला, तरी काही झाला नाही… शेवटी मीच देवाच नाव घेत वेळ काढला. मनात आल त्या वाहिनी आजीबाइना माझ्या जागी बसवाव, पण छे , वॉल्यूम थोडी कमी होणार होता…. त्यांच्या बोलाण्याला   घाबरून मी “कुठे चाललात? ”  विचारायच धाडस केल  नाही !   त्यांच वय अन् एनर्जी मॅच होण्यासारखं नव्हतच ! हळू हळू कसातरी वेळ काढला . लोणावळ्या ला बस थांबली, अन् आजीबाई उतरल्या. बस तिला सोडून निघेल तर बर होईल असा विचार येताच, कंडक्टर विचारपूस करत आला अन् विचारावा तरी काय?? “त्या आजीबाई आल्या नाहीत का???”  मग काय आल्या आजीबाई, अन् पुन्हा पुन्हा लाइव टेलीकास्ट ऐकायला सुरूवत झाली. तशी सवय ही होत गेली. मग काय  भाग्याला अन् कर्माला दोष देत बसलो. लोणावळा स्टॉप आला अन् माझ्या मनाला आधार मिळाला.. आजीबाई उतरल्या !!…………….  अन् मी परत एक डुलकी काढली ……!

Leave a Reply