इटा पिटाचा जोगवा

इटा-पिटाचा जोगवा | यागो बायानो दरबारी |
मला जाईचं दुरवरी | तुळजापूरच्या बाजारी |
तुळजापुरी जाईन , आईला पाट घेईन |
आईला पाटावर बसविन गं , परत माघारी येईन ||१||
तुळजापुरी जाईन, आईला साडी घेईन |
आईला साडी नेसवीन गं , परत माघारी येईन ||२ ||
तुळजापुरी जाईन, आईला बांगड्या घेईन |
आईला बांगड्या चढवीन गं , परत माघारी येईन ||३||
तुळजापुरी जाईन, आईला मंगळसूत्र घेईन |
आईला मंगळसूत्र घालीन गं , परत माघारी येईन ||४||
तुळजापुरी जाईन, आईला नथ घेईन |
आईला नथ घालीन गं , परत माघारी येईन ||५||
तुळजापुरी जाईन, आईला पैजण घेईन |
आईला पैजण चढवीन गं , परत माघारी येईन ||६||
तुळजापुरी जाईन, आईला जोडवे घेईन |
आईला जोडवे घालीन गं , परत माघारी येईन ||७||
इटा पिटाचा जोगवा
तुळजापुरी जाईन, आईला वेणी घेईन |
आईला वेणी घालीन , परत माघारी येईन ||८||
तुळजापुरी जाईन, आईला हार घेईन |
आईला हार घालीन गं , परत माघारी येईन ||९ ||

Leave a Reply