हे अंबे भवानी अंबे , जगदंबे भवानी अंबे
हे अंबे भवानी अंबे , जगदंबे भवानी हे अंबे भवानी अंबे ||
मी लहान बालक तुझे हाती घेऊन कार्य तुझे
नमितो पूजितो , अंबे तुला भवानी , हे अंबे भवानी ||१||
तुझे रूप मी वर्णू किती
अष्टभुजा वाघावर बैसली
हाती घेऊन त्रिशूल दुष्टांचा संहार तू अंबे भवानी करी ||२||
आमच्या हाती चुका किती होती
क्षमा त्यांना अंबे तू करिसी
दया क्षमा शांती तेथे तुझी वस्ती हे अंबे भवानी अंबे ||३||
संकट येत अंबे तू धावसी ,
बालकांना अंबे तू पावसी
आम्ही शरण येत सत्याचा झेंडा घेऊन उभी राहसी ||४||
2016-10-07