आई माझी वाघावर बैसली गं वाघावर बैसली |
आई तू अष्टभुजा खरी गं |
आई तुझ्या हाती शस्त्रे किती गं |
त्याने तू दुष्टांचा नाश करी गं |
आई तू नऊ दिवस बैसली ग |
आई तुझे पुजारी कोण कोण होते गं |
आम्ही लहान बालके पुजारी होते ग |
आई तू धावून कशी ग येशी ग |
तुला हाक मारता धावून येशी ग |
आई तू बोधाचा झेंडा देशी गं |
आई तू सत्याचा जयजयकार करी ग ||धृ ||
2016-10-07