आई-वडिलांच्या छत्र छायेत

अस्तित्वात असता आई-वडिलांच्या छत्र छायेत ,
दोन बोल प्रेमाचे बोलून घ्या ,
मुख बंद झाल्यास , त्यात गंगाजल ठेऊन काय कराल ….

हृदयाला प्रेमाने स्पर्श करा
खर्या रूपाने आशीर्वाद मिळवा
जवळ नसता फोटो समोर नत-मस्तक होऊन काय कराल ….

अस्तित्वात असताच भरभरून प्रेम करा ,
बोट धरून जग फिरवा ,
जग सोडून जाता , डोळ्यातील अश्रू गाळून काय कराल ….

माता-पितांचा सहवास भाग्यवंत मुलांनाच मिळतो ,
तीर्थ क्षेत्राचे भाग्य त्यांच्या चरणाशीच लाभतो ,
अनवाणी चरणांनी तीर्थक्षेत्र करून काय साधणार
नदी – तटावर शिंपले गोळा करण्यातच तुमचे आयुष्य संपणार ….

आई-वडिलांसाठी कधी ‘श्रावण बाल ‘ बना ,
हातात हात घेऊन कधी तीर्थस्नान करवा ,
मातृदेवो भव:, पितृदेवो भव: हेच जीवनाचे सत्य आहे
राम-नाम सत्य बोलण्यात काय अर्थ आहे ….

पैसा खर्चुनी विकत घेतले सुख आपले
पण माय-बाप न मिले
गेलेली वेळ पुन्हा न येती हाती
मग लाखो कामाउनी काय कराल ….

मायेने हात फिरवून ‘बाल ‘ अशी साद कोण घालणार ….
मग त्याच आठवणीत अश्रू गाळलेले कोण पाहणार …

Leave a Reply