एका विवाहीत मुलीचे आईस पत्र
🌸आई तुझी खुऽऽऽऽऽऽप आठवण येते……
आता माझी सकाळ 5.30 ला होते आणि
रात्र 12 वाजता…….
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
🌸सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढते
आणि स्वतः मात्र शेवटी थंड जेवण जेवते…
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
🌸जेव्हा सासरी कुणी आजारी पडते..
तेव्हा त्यांच्या सेवेसाठी लगेचच हजर होते..
पण जेव्हा मला बरे नसते तेव्हा स्वतः ची काळजी स्वतःच घेते….
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
🌸रात्री सगळे झोपल्यावर त्यांना आठवणीने पांघरून घालते
पण जेव्हा मला पांघरूण घालायला कुणीही नसते….
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
🌸सगळ्यांच्या गरजा पूर्ण करता करता
स्वतः लाच विसरते..
पण मन मोकळं करायला जवळ कुणीही नसते…
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
🌸कदाचीत हीच कहानी लग्नानंतर प्रत्येक मुलीची होत असेल…..
लग्नाअगोदर प्रत्येक मुलगा मुलीला
वचन देतो…
लग्न झाल्यावर सासरी तुला आईची
आठवण येउ देणार नाही……
पण तरीही का ???………
आई तुझी खुऽऽऽऽऽऽप आठवण येतेय ग…