किती मंद तो प्रकाश तूझ्या गर्भामध्ये होता.
स्वर्गातला तो काळ माझ्या भोवताली होता.
एकटाच मी अन माझं जग तुच होतीस.
या भयान जगापासून मला लपवून तू होतीस.
तूझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.
तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.
तुला मला जोड़नारी एक कोमल दोर आत होती.
तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती.
तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे.
कान माझे फक्त़ तुझ्या आवाजाला तरसायचे.
तू स्वतःला किती किती जपायचीस.
एक मी जगावं म्हणून तू किती किती मरायचीस.
जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.
पण मी जगावं फक्त हाच तुझा ध्यास.
गर्भातले ते महीने पुन्हा येणार नाहीत.
पण मी अजूनही तुझ्याशिवाय जगू शकणारच नाही.
2017-03-11