आचार विचार हि घराची आखणी आहे,
प्रेम हा घराचा पाया आहे ,
थोर माणसे घराचे भिंती आहेत,
सुख हे घराचे छत आहे ,
जीव्हाळा हा घराचा कळस आहे,
माणुसकी ही घराची तिजोरी आहे,
गोड शब्द ही घराची धन दौलत आहे,
शांतता ही घराची लक्ष्मी आहे ,
आत्मविश्वास ही घरातील देवस्थान आहे,
दुजाभाव विसरणे ही घराची तेजस्वी समई आहे,
पैसा हा घराचा पाहुणा आहे ,
गर्विष्टपणा ही घराची वैरी आहे ,
नम्रता ही घराची प्राण प्रतिष्टा आहे ,
व्यवस्था ही घराची शोभा आहे ,
समाधान हे घराचे सुख आहे ,
सदाचार हा घराचा सुगंध आहे,
चारित्र्यसंपन्नता ही घराची कीर्ती आहे,
अशाच घरात ईश्वराची जागृत मूर्ती आहे..
2017-04-22